ग्लोबल सिटीझन लाईव्ह इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा होस्ट म्हणून स्टेजवर होती तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या. प्रियांका चोप्रा निळ्या आणि काळ्या फ्लोरलच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. ती जगातील सर्वात मोठी म्यूझिक नाईट होती, हा इव्हेंट प्रियांका चोप्रा आणि अनिल कपूर यांना होस्ट करण्याची संधी मिळाली.
या म्युझिक नाईटमध्ये प्रियंका चोप्रा जबरदस्त दिसत होती. तिचे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील एकामध्ये ती प्रेक्षकांना शांततेचे साईन दाखवताना दिसली होती.
कार्यक्रमापूर्वी प्रियांकाने स्वतःचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता, ज्यात ती ग्लोबल सिटीझन लाईव्ह कार्यक्रमासाठी मी पॅरिसमध्ये असल्याचे सांगताना दिसली होती.
याशिवाय, प्रियांकाने पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोरही तिचं फोटोशूट केलं.
प्रियांकाने निळ्या रंगाच्या ड्रेससह गोल्डन स्टिलेटोस परिधान केले होते. सोबतच तिनं अतिशय मोहक ज्वेलरी कॅरी केली होती, ज्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती.