‘चांदनी’ ची झलक रसिकांना कायम पाहायला मिळणार, कठोर परिश्रम करत जान्हवी कपूरचे बॉलिवूडमध्ये स्थान कायम… Happy Birthday गुंजन सक्सेना
जान्हवीचा गुंजन सक्सेना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील जान्हवीचे काम सर्वांनाच आवडले होते. आज जान्हवीचा वाढदिवस आहे TV9 मराठी कडून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
1 / 5
जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. आपल्या मुलीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल श्रीदेवी खूप उत्साहित होती, मात्र चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी अभिनेत्रीचे निधन झाले.
2 / 5
यानंतर जान्हवीने एक छोटा ब्रेक घेतला आणि ती पुन्हा २०२० मध्ये घोस्ट स्टोरीज या चित्रपटात दिसली. या हॉरर चित्रपटातून तिला आपली जादू दाखवता आली नाही. पण त्याच वर्षी जान्हवीचा गुंजन सक्सेना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील जान्हवीचे काम सर्वांनाच आवडले होते.
3 / 5
जान्हवीचा रुही हा चित्रपट 2021 मध्ये कोविड दरम्यान पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील हॉरर कॉमेडी जान्हवीच्या अभिनयात बरेच बदल पाहायला मिळाले. जान्हवीच्या अभिनयाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
4 / 5
जान्हवीकडे आता 3 चित्रपट आहेत, पण त्यांच्या रिलीजबद्दल फारशी माहिती सांगता येत नाही. दोस्ताना २, गुड लक जेरी, मिली या चित्रपटात ती दिसणार आहे.
5 / 5
काही काळापूर्वी जान्हवी कपूरने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी सध्या एलएमध्ये (लॉस एंजेलिस) सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. जान्हवीच्या या फोटोंमध्ये एक मुलगाही दिसला आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली होती.