‘हिरामंडी’ वेबसिरिजमध्ये सर्वाधिक मानधन कोणत्या अभिनेत्रीने घेतलं?
Sanjay Leela Bhansali Heeramandi Series Highest paid Actress : हिरामंडी या वेबसिरिजची सध्या प्रचंड चर्चा आहे. पण या वेबसिरिजमध्ये सर्वाधिक मानधन कोणत्या अभिनेत्रीला मिळालं? या वेबसिरिजमधील कलाकारांना किती मानधन देण्यात आलंय? वाचा सविस्तर माहिती......
1 / 6
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी : द डायमंड बाजार ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. या वेबसिरिजमधील कलाकारांच्या अभिनयाची, हीरामंडीच्या सेटची अन् कलाकारांच्या कपड्यांची प्रचंड चर्चा आहे.
2 / 6
हीरामंडीतील डायलॉग आणि गाणीही चर्चेत आहेत. पण हीरामंडीनमधील कलाकारांना किती मानधन घेतलं. सर्वाधिक मानधन कुणी घेतलं? माहिती आहे का? जाणून घेऊयात...
3 / 6
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने हीरामंडीमध्ये 'फरिदन' हे पात्र साकारलं आहे. या पात्रासाठी तिने सर्वाधिक मानधन घेतलं. सोनाक्षीने 2 कोटी रूपये घेतलेत.
4 / 6
अभिनेत्री मनीषा कोयराला हिने मल्लिकाजान हे पात्र हीरामंडीमध्ये साकारलं आहे. 28 वर्षांनंतर मनिषाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीसोबत काम केलं आहे. यासाठी तिने 1 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. 1996 मध्ये 'खामोशी: द म्यूजिकल' या सिनेमात मनिषाने भन्साळींसोबत काम केलं होतं.
5 / 6
बिब्बोजान या भूमिकेसाठी अदिती राव हैदरीने 1.5 कोटी मानधन घेतलं आहे. तर अभिनेत्री रिचा चड्डाने लज्जो भूमिका साकारण्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतलं.
6 / 6
संजय लीला भन्साळी यांची भाची असणारी अभिनेत्री शरमीन सेगलने आलमजेब ही भूमिका साकारण्यासाठी 35 लाख मानधन घेतलंय. तर अभिनेत्री संजीदा शेख हिने वहीदाची भूमिकेसाठी 40 लाख रुपये मानधन घेतलंय. तर फरदीन खानने 75 हजारांचं मानधन या सिरिजसाठी घेतलं आहे.