गायक हनी सिंह हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हनी सिंह हा त्याच्या न्यू म्यूजिक अल्बम हनी 3.0 चे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. मात्र, नुकताच हनी सिंह याच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. हनी सिंह आणि त्याच्या टिमवर केलेल्या आरोपांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
विवेक रवि रमन यांनी हनी सिंह आणि त्याच्या टिम विरोधात तक्रार दाखल केलीये. या तक्ररीमध्ये चक्क मारहाण, अपहरण असे काही गंभीर आरोप हे करण्यात आले आहेत. रमन यांनी हनी सिंह 3.0 नावाचा संगीत महोत्सव आयोजित केला होता. कार्यक्रम मुंबईतील बीकेसी मैदानावर 15 एप्रिल रोजी होणार होता. मात्र, हा कार्यक्रमा अचानक रद्द करण्यात आला.
विवेक रवि रमन यांनी हनी सिंह आणि त्याच्या टिमवर आरोप केले. आता यावर हनी सिंह याने मोठे भाष्य केले आहे. हनी सिंह याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, माझ्यावर दाखल करण्यात आलेली तक्रार आणि जे आरोप करण्यात आले आहेत सर्वकाही निराधार आहेत.
माझा किंवा माझ्या कंपनीचा या प्रकरणासी काहीच संबंध नाहीये. मुंबई शोसाठी मी ट्रायव्हाइब नावाच्या कंपनीशी संबंधित होतो, जी बुक माय शोसोबत जोडलेली कंपनी आहे. या कार्यक्रमामध्ये माझा जेवढा वेळ ठरवला, त्याप्रमाणे मी माझ्या परफॉर्म केला आहे.
हनी सिंह हा पुढे म्हणाला की, माझ्यावर जेवढे काही आरोप लावले आहेत. ते सर्व खोटे आहेत. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. आता या प्रकरणात पोलिस तपास करत आहे, पुढे अजून काय होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.