'बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर ही लग्नगाठ बांधणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
लवकरच अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. अंकिता आणि कुणाल हे दोघे प्री- वेडिंग सुरु झाली आहे.
अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल लवकर प्री- वेडिंग करणार आहे. त्याची शॉपिंग या दोघांनी सुरु केली आहे. याचे व्लॉग अंकिता शेअर करते आहे. याबाबत अंकिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
याचा फोटो शेअर करत प्री-वेडिंग शूट करणे आवश्यक आहे का? असं म्हणत अंकिताने कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. हो तुम्ही प्री- वेडिंग केलं पाहिजे. आठवणी जपल्या पाहिजेत, असं अंकिताच्या चाहत्याने म्हटलं आहे.
फेब्रुवारीमध्ये अंकिता आणि कुणाल लग्न करणार असल्याची चर्चा आहे. लग्नाची तयारी आता या दोघांनी सुरू केली आहे. हे दोघेही नुकतंच अंकिताच्या घरी देखील गेले होते. या जोडीला प्रेक्षकांची देखील पसंती मिळतेय.