माधुरी दीक्षित की पती श्रीराम नेने? सर्वाधिक श्रीमंत कोण?; काय आहे डिटेल्स?
माधुरी दीक्षित आणि तिच्या पती डॉ. श्रीराम नेने यांच्या संपत्तीची तुलना या लेखात केली आहे. या लेखात त्यांच्या कमाईचे मार्ग आणि मालमत्तेची माहिती देण्यात आली आहे. तसेच या दोघांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण हे स्पष्ट केले आहे.
1 / 7
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ अशीही तिची ओळख आहे.
2 / 7
माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर काही वर्षे ती अमेरिकेला स्थायिक झाली होती. माधुरी व डॉ. श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत.
3 / 7
माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता याचे उत्तर समोर आले आहे.
4 / 7
माधुरी दीक्षित ही 250 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. ती एक चित्रपट करण्यासाठी 4-5 कोटी रुपये घेते. त्याचबरोबर ती रिअॅलिटी शोच्या एका पर्वासाठी 24-25 कोटी आकरते.
5 / 7
माधुरी दीक्षितने जाहिरातीतून सर्वाधिक कमाई केली आहे. ती एका ब्रँडसोबत जाहिरात करण्यासाठी 8 कोटी रुपये घेते. माधुरी दीक्षितची सध्याची संपत्ती ही ३५ मिलियन म्हणजेच २६४ कोटी आहे.
6 / 7
तर Celebritynetworth ने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती ३५ मिलियन डॉलर इतकी आहे. ते पेशाने डॉक्टर असून ते कार्डिओ सर्जन आहेत.
7 / 7
माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी परिसरात एक अलिशान घर खरेदी केलं होतं. माधुरी आणि तिचे पती डॉ.श्रीराम नेने यांनी हरियाणातील पंचकूलामधील एक बंगला विकला होता.