बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.
वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा माधुरी कमालीची सुंदर दिसते. बॉलिवूडमध्ये तिची 'धकधक गर्ल' म्हणून ओळख आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
आता ती नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
आता या चंदेरी साडीमधील काही फोटो माधुरीनं शेअर केले आहेत. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसतेय.
माधुरी सध्या प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने’ मध्ये परिक्षकाची भूमिका सांभाळतेय. या सेटवर माधुरीच्या दिलखेचक अदा पाहायला मिळतात.