Bhargavi Chirmuley Birthday : वनरूम किचन ते संदूक… भार्गवी चिरमुलेची ‘एकापेक्षा एक’ सिनेमांची मालिका…

| Updated on: Mar 29, 2022 | 8:10 AM

Bhargavi Chirmuley Birthday : अभिनेत्री भार्गवी चिरमुलेचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या करिअरवर एक नजर टाकुयात...

1 / 6
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेचा आज वाढदिवस आहे. तिने किती सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलंय तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात...

2 / 6
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने आतापर्यंत 13 सिनेमे आणि 19 मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक सिनेमांमधील तिच्या कामाचा प्रेक्षकांच्या मनावर ठसा आहे.

3 / 6
भार्गवीने 'विश्वविनायक' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली ते मागे वळून पाहिलंच नाही... पुढे तिने 'आयिडियाची कल्पना', 'धागेदोरे' या सिनेमांमध्ये काम केलं. मग तिच्या करियरमधला मैलाचा दगड आला तो 'वन रूम किचन'च्या रूपाने. यात तिने भरत जाधव सोबत काम केलं. या सिनेमाचं आणि तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं.

4 / 6
गोळाबेरीज', नवरा माझा भवरा, 'सासू स्वयंवर' या सिनेमामध्येही तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या.  'संदूक','ओली की सुकी', 'हिच्यासाठी कायपण' हे तिचे अलिकडे आलेले सिनेमे. या शिवाय ती 'एकापेक्षा एक', 'फु बाई फू' या रिअॅलिटी शोचाही भाग होती.

5 / 6
भार्गवीला नाटकांमध्येही काम करायला आवडतं. 'हिमालयाची सावली', 'झोपी गेला जागा झाला' या नाटकांमध्ये तिने काम केलं आहे.

6 / 6
शिवाय तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलंय. 'आनंदी गोपाळ','चार दिवस सासूचे', 'अनुबंध', 'पिंजरा', 'असंभव', 'श्रीमंत गंगाधर पंत', 'अनुपमा', 'सुवासिनी', 'भाग्यविधाता', 'प्रपंच', 'स्वराज्य जननी जिजामाता', 'जागो मोहन प्यारे', 'मोलकरीण बाई' या मालिकांमध्ये तिने काम केलंय. सध्या तिची 'आई मायेचं कवच' ही मालिका कलर्स मराठीवर सुरू आहे.