अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती सतत तिचे नवनवे फोटो व्हीडिओ शेअर करत असते. आताही तिने तिचे असेच हटके फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने तिचे बीच लुकमधले काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने बिकिनी स्कर्ट घातलेला पाहायला मिळतोय. या लुकला जाणारी टोपीही तिने घातली आहे.
सोनाली सध्या मेक्सिकोमध्ये तिथले वॅकेशन मूडमधले फोटो ती शेअर करत आहे. या फोटोला तिने "नमस्ते मेक्सिको!", असं कॅपेशन दिलं आहे.
तिच्या या फोटोला 43 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत तिच्या या लूकची तारिफ केली आहे.
सोनालीने नुकतंच आपल्या Wedding Anniversary निमित्त तिचा पती कुणालसोबत दुसऱ्यांदा मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं असल्याचं जाहीर केलं. त्याची माहिती लवकरच देणार असल्याचंही तिने सांगितलं आहे.