हरनाझ कौर संधू हिने 2021 चा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. तो क्षण भारतासाठी अभिमानाचा होता. सगळ्या देशाने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. पण भारताची शान असणाऱ्या हरनाझला सध्या ट्रोल केलं जातंय.
हरनाझला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. त्याचं कारण आहे तिचा फिटनेस. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यावेळी हरनाझ अगदी फिट होती पण सध्या ती थोडी जाड झालेली दिसतेय. हाच धागा पकडत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
हरनाझने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला त्यावर तिला ट्रोल केलं गेलं. काहींनी तिच्या फोटोवर कमेंट करत "तू एवढी जाड कशी काय झालीस?", असा प्रश्न विचारला आहे.
हरनाझ सध्या वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर करत आहे. हा तिचा फुलांची डिझाइन असलेला फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरला.
काही दिवसांआधी हरनाझ न्यूयॉर्कमध्ये गेली होती. तेव्हा तिथे तिने हा कुल लूक कॅरी केला होता. त्याचे फोटो अनेकांना आवडले होते.