मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आणि बाॅलिवूड अभिनेता महाक्षय चक्रवर्ती याने नुकताच चित्रपटाच्या प्रमोशन वेळी नेपोटिझमवर (घराणेशाहीवर) मोठे भाष्य केले आहे. महाक्षय चक्रवर्ती थेट म्हणाला की, नेपोटिझम वगैरे असे काहीच नसते. तसे जर काही असते तर मी चार- पाच चित्रपटांमध्ये सतत दिसलो असतो ना...
महाक्षय चक्रवर्ती म्हणाला की, मी बाॅलिवूडमध्ये यावे यासाठी माझ्या आई वडिलांचा अजिबात दबाब नव्हता. मी ज्यावेळी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला सरळ सांगितले होते की, माझा मुलगा असल्याने तुला फ्री तिकिट मिळणार नाहीये.
तुला तुझ्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवावे लागेल. तुला जरी बाॅलिवूडमध्ये काम करायचे असेल तर तुला संघर्ष करावा लागेल. या काळात मी तुझी काही मदत करणार नाहीये. तुला स्वत: ला सिद्द करावे लागले आणि मी तेच करत आहे.
तुला बाॅलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, हे माझ्या वडिलांनी मला अगोदर बजावून सांगितले होते. अजूनही मी इतरांप्रमाणे संघर्षच करत आहे आणि मला खरोखरच याचा प्रचंड अभिमान देखील आहे. माझ्या आयुष्यात देखील तो काळ आलाय, ज्यावेळी मला काम मिळत नव्हते.
मुळात म्हणजे मला काम न मिळण्याचे कारण म्हणजे मी ऑडिशनमध्ये सिलेक्ट होत नव्हतो. मी अनेक चित्रपटांचे, वेब सीरिजचे ऑडिशन दिले आहे. बऱ्याच वेळा मी सिलेक्ट देखील झालो नाहीये. मी एक अभिनेता असल्याने मला ऑडिशन देणे महत्वाचेच आहे आणि मी ते कायमच करतो.