यावेळी राधिकाने 'पार्च्ड'च्या न्यूड सीनबद्दल देखील सांगितले. ती म्हणते, 'हा सीन करणे माझ्यासाठी सोपे नव्हते, कारण त्यावेळी मी स्वत:च्या ‘बॉडी इमेज’शी झगडत होते. म्हणून स्क्रीनवर पुन्हा न्यूड होणे जरा भीतीदायक होते. मात्र, आता मी अशी दृश्ये न घाबरता देऊ शकते. ' राधिका पुढे म्हणाली की, तिला आपल्या शरीराचा, आकाराचा आणि स्वतःचा अभिमान आहे. ती म्हणते की, हा चित्रपट बर्याच ठिकाणी नावाजला गेला, ज्यामुळे माझे कौतुक झाले व मला काम मिळाले. राधिका म्हणाली, 'मला अशा भूमिकेची मला खूप गरज होती. कारण जेव्हा आपण बॉलिवूडमध्ये असतो, आपल्याला आपल्या शरीरात काय बदल करावे लागतील, हे सतत सांगितले जाते. मी नेहमीच मेंटेन असते, म्हणून मला माझ्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काहीही करण्याची गरज भासत नाही.'