
शाहरुख खान सोबतच्या 'चेन्नई एक्सप्रेस'मधील आयटम साँगमुळे ओळख मिळालेल्या अभिनेत्रीने नवीन लग्जरी कार विकत घेतलीय. तिच्याकडे आधीपासूनच आलिशान कार्स आहेत.

साऊथ आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावणारी प्रियामणी सिंपल राहते. पण खूप लग्जरी आयुष्य जगते. आज प्रियामणी अभिनयामुळे लक्षात राहते.

प्रियामणीला कार्सचा खूप शॉक आहे. तिच्याकडे आलिशान कार्स आहेत. पण तरीही तिने आणखी एक महागडी गाडी विकत घेतलीय. त्या कारची किंमत लाखोंमध्ये आहे.

प्रियामणीने Mercedec-Benz GLC विकत घेतलीय. या लग्झरी कारची किंमत 74.20 लाख रुपयापासून सुरु होते.

गाडीची डिलीवरी घेतानाचे अभिनेत्रीचे फोटो समोर आलेत. परंपरेनुसार प्रियामणी कुटुंबासोबत गाडीची पूजा करताना दिसतेय. डिलीवरी घेतल्यानंतर तिने केक कापून सेलिब्रेशन केलं.