
बिग बॉस 17 हा रिअॅलिटी शो आता निर्णायक वळणावर आला आहे. टॉप 5 स्पर्धक निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यातच अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.

पती विकी जैन एलिमिनेच होताच अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले. त्याच क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि अंकिता भावून झाली आहे.

तुम्ही बिग बॉसचा गेम खूपच चांगल्या प्रकारे खेळलात. कुणाच्याही सपोर्टशिवाय इथंपर्यंत आलात. या खेळात स्वत: चं अस्तित्व निर्माण केलं, असं अंकिता म्हणाली.

मला तुमची पत्नी असल्याचा प्रचंड गर्व आहे. मी गर्वाने म्हणू शकते की, मी विकी जैनची पत्नी अंकिता लोखंडे आहे, असं अंकिता म्हणाली. त्यानंतर अंकिता रडायला लागली.

अंकिताला रडताना पाहून विकी चिडला. तो म्हणाला की, आता मला बाहेर जायला पाहिजे. कारण, बाहेर जाऊन पार्टी करायची आहे, असं विकी म्हणाला. विकीच्या एलिमिनेशची सोशल मीडियावर विविध पोस्ट पाहायला मिळतायेत.