बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता नुकतंच 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर पार पडला आहे.
त्यामुळे आता स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. गेले अनेक दिवस नवनवीन कलाकारांची नावं चर्चेत होती त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ. अभिनेत्री स्नेहा वाघनं आता बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे.
स्नेहानं अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला यासारख्या मालिकांतून स्नेहा वाघने लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ज्योती मालिकेतून स्नेहाने हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. एक वीर की अरदास.. वीरा, शेर ए पंजाब – महाराजा रणजीत सिंह, चंद्रशेख, बिट्टी बिजनेस वाली, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्या, कहत हनुमान जय श्री राम यासारख्या अनेक मालिकांमधून तिने नाव कमावलं.
‘बिग बॉस’च्या या घरात स्नेहा वाघसोबतच अभिनेता आविष्कार दारव्हेकरनं सुद्धा एंट्री केली आहे. अविष्कार घरात येताच स्नेहाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले दिसले होते. यामागचं कारण म्हणजे आविष्कार हा स्नेहा वाघचा पहिला पती आहे.
स्नेहा नेहमीच तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेच राहिली आहे. स्नेहाने दोन लग्न केले असून तिचा दोनदा घटस्फोट सुद्धा झाला आहे.