मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल (29 नोव्हेंबर) रोजी मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली आहे.
कोस्टल रोड हा मुख्यनंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
या पाहणीदरम्यान कोस्टल रोडचं काम कुठपर्यंत झालं आणि हा प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात आढावा घेण्यात आला.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हाजीअली परिसर आणि वरळीतील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. हा संपूर्ण प्रोजेक्ट 2023 पर्यंत पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कामाच्या पाहणी नंतर दिलं आहे.
हा संपूर्ण प्रोजेक्ट 2023 पर्यंत पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कामाच्या पाहणी नंतर दिलं आहे.
सोबतच आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात सुरू असलेल्या काही पायाभूत प्रकल्पांनासुद्धा भेट दिली आहे.
वरळी मतदारसंघात रस्ते, पादचारी पूल यांच्या सौंदर्यीकरणावर काम सुरू आहे.