कॉमेडी क्वीन भारती सिंह तिच्या अनोख्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
विनोदी शैलीमुळे चर्चेत असणारी भारती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या मनोरंजन विश्वात अनेक बड्या कलाकारांना बाळाची चाहूल लागली आहे.
आता भारतीही आई होण्याचा विचार करते आहे. यावेळी भारतीने चक्क तसे वचनच दिले आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2021मध्ये मी ही माझ्या बाळाचे स्वागत करेन, असं तिने बोलून दाखवलं आहे.
‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाच्या मंचावर भारतीने ही गुड न्यूज दिली.
सध्या भारती सिंह तिचा नवरा हर्ष लिंबाचियासोबत सोनी टीव्हीच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत.