
आंध्रात प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष वायएस शर्मिला यांनी पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कंबरेपर्यंतच्या पाण्यात उतरुन पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ताडेपल्ली ग्रामीण मंडळातील नंदमुर गावात पुराने नष्ट झालेल्या शेतीची पाहणी केली.

चंद्राबाबूंचे तेलगू देशमचे (टीडीपी) सरकार आंध्रात आल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी एनडीए सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात आंध्राच्या पदरात भरघोस निधी पाडून घेतला आहे. जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी टीडीपी सरकारच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले.या आंदोलनाला समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पाठिंबा देत इंडिया आघाडीत सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे.

आंध्रात एनडीए सरकार आहे. यंदाच्या बजेटमध्ये आंध्रप्रदेशसाठी भरीव तरतूद केल्याने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू खुश झाले आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे लक्ष धरणे धरण्याकडे लागले आहे.त्यांना आंध्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असा आरोप कॉंग्रेसच्या नेत्या वायएस शर्मिला यांनी आपले बंधू जगनमोहन यांच्यावरच केला आहे.

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली येथे भयानक पूरजन्य परिस्थिती आहे. गुजरात येथील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूरात कोयना आणि राधानगरी डॅमचे पाणी सोडल्याने कोल्हापूरातील मुंबई ते बंगळुरु हायवेला जोडणारे अनेक मार्ग बंद झाले आहेत.

गुजरात येथे देखील पुरपरिस्थिती बिकट झाल्याने गुजरात येथील पुरगस्तांच्या मदतीला अनेक मुस्लीम सघटनांनी पुढाकार घेत मदतसाहित्य वाटप केले आहे.गुजरात महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असून तेथेही कोस्टल भागात मुसळधार वृष्टीने पूर आला आहे.