Photos : शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी वायनाडमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत ट्रॅक्टरही चालवला
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज (22 फेब्रुवारी) आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये पोहचले.
राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण जग भारतीय शेतकऱ्यांच्या अडचणी पाहत आहेत. मात्र, दिल्लीचीस मोदी सरकारला शेतकऱ्यांचं दुःख दिसेना.
Follow us
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज (22 फेब्रुवारी) आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये पोहचले.
वायनाड जिल्ह्यातील थ्रिक्काइपट्टा ते मुत्तिल दरम्यान राहुल गांधींनी 6 किलोमीटर लांब ट्रॅक्टर रॅली केली आणि त्यानंतर उपस्थितांना संबोधित केलं.
राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण जग भारतीय शेतकऱ्यांच्या अडचणी पाहत आहेत. मात्र, दिल्लीचीस मोदी सरकारला शेतकऱ्यांचं दुःख दिसेना.
हे तिन्ही कृषी कायदे भारताची कृषी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी तयार करण्यात आलेत, असाही आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी म्हणाले, शेती 40 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसह देशातील सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि त्याच्याशी कोट्यावधी भारतीय नागरिकांचा संबंध आहे.
शेती एकमात्र असा व्यवसाय आहे ज्याचा संबंध भारत मातेशी आहे आणि काही लोक याच व्यवसायावर अतिक्रमण करत आहेत, असंही राहुल गांधींनी म्हटलं.