क्रिकेट विश्वातलं ‘न्यूली वेड’ क्युट कपल अर्थात युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
या व्हेकेशन ट्रीपमधले काही क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत दोघेही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत.
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल हे कपल सोशल मीडियावर बरंच सक्रिय आहे.
दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
परदेशातच नव्हे तर, भारतातही हे दोघे एकमेकांसोबत धमाल करताना दिसतात. याचेही काही फोटो धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केले होते.