Photo : Wardha Tiger | बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी, कॅटरिना वाघिणीसह दोन छाव्यांचे दर्शन, वन्यप्राणी वेधताहेत लक्ष
वर्धा : वाघांचे आश्रयस्थान असलेले बोर व्याघ्र प्रकल्प सध्या विविध वन्यप्राण्यांनी फुलले आहे. वाघ, मोर, रानकुत्रे, हरिण आदी विविध वन्यप्राणी दिसू लागल्याने बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांचा ओढाही वाढलाय. व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असलेल्या बीटीआर-3 या कॅटरिना नामक वाघिणीचे तिच्या दोन छाव्यांसोबत यंदाच्या उन्हाळ्यात बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये वास्तव्य राहिले.
हे सुद्धा वाचा