‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
आता धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे धनश्री सेल्फ टाईम स्पेन्ड करताना दिसत आहे.
ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतेय. आता तिनं नाईट सूटमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत एक क्युट डान्स केला आहे. सोबतच फोटोशूटही केलंय.
धनश्रीचा हा व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
काही दिवसांपूर्वीच धनश्रीचा डोहाळे जेवण सोहळा पार पडला. धनश्रीला आता बाळाच्या आगमनाची आतुरता लागली आहे.