दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. दलजीत कौर हिने निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले होते आणि ती विदेशात शिफ्ट झाली.
अचानक पतीचे घर सोडून दलजीत कौर ही भारतात पोहोचली. दलजीत कौर भारतात दाखल झाल्यापासून विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता नुकताच दलजीत कौरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये.
दलजीत कौर हिने पोस्टमध्ये म्हटले की, हिलिंग सुरू आहे. काही गोष्टी समजण्यास वेळ लागत असल्याचे दलजीत काैरने म्हटले.
जे पण लोक मला मेसेज करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छित आहे की, मला या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी वेळ लागेल. सॉरी पण मी निखिल बनू शकत नाही.
लग्न तुटून काही दिवसच झाले नाहीत तोवरच निखिल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहत आहे. त्याला काहीच फरकच पडत नाही. या काळात जे लोक माझ्यासोबत उभे राहिले त्यांचे मी आभार मानते.