Photo Gallery : अवकाळीच्या नुकसान खुणा, चिकूची बाग उध्वस्त, फळगळतीने स्वप्नांचा चकणाचूर
लासलगाव : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेला आहे. गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सर्वाधिक नुकसान हे अवकाळी पावसामुळे झालेले आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामाच्या सुरवातीपासून ते तोडणीपर्यंत झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनावरील खर्चही पदरी पडणार की नाही अशी अवस्था झाली आहे. यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील चिकू बाग उध्वस्त झाली आहे. येथील शेतकरी कालीम पठाण यांचे 3 एकर चिकूची बाग पूर्णपणे वाकली असून फळगळती झाली आहे. बाग तर हिरवीगार मात्र, फळगळतीने कच्च्या चिकूचा सडाच पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान त्यांचे झाले आहे.
Most Read Stories