
स्वप्नांचा चुराडा : यंदा चिकूमधून अधिकचे उत्पादन मिळेल असा आशावाद पठाण यांना होता. शिवाय फळही तसेच होते. वर्षभरापासून तीन एकरातील बाग त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासली होती. शिवाय उत्पादन वाढीची आशा त्यांना लागली असतानाच अवकाळीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे.

3 एकरावर चिकूची बाग: येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील शेतकरी कालीम पठाण यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन द्राक्षाला पर्याय म्हणून चिकूची लागवड केली होती. शिवाय आतापर्यंत सर्वकाही सुरळीत होते. चिकूही परिपक्व होण्यासाठी केवळ महिन्याभराचा आवधी होता. मात्र, त्यापूर्वीच पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये होत्याचे नव्हतं झाल आहे.

नुकसान भरपाईची मागणी : गेल्या वर्षभरापासून केवळ नुकसान आणि नुकसानच. एकही पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने ही अवस्था ओढावली आहे. फळबागायत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून शासनाने आता मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे पठाण यांनी सांगितले आहे.

न भरुन निघणारे नुकसान : चिकू परिपक्व होण्यापूर्वीच वादळी वाऱ्यामुळे त्याची पडझड झाली आहे. आतापर्यंत द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते पण या भागातील द्राक्ष तोडणी अंतिम टप्प्यात असून आता उर्वरीत पिकांना अवकाळीचा फटका बसलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट ही निश्चित मानली जात आहे.