बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव नसतो, तर दुसरीकडे त्यांची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. आयरा खाननं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
आयरा खानने तिचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आयरा स्विमिंग पूलजवळ खुर्चीवर बसली आहे.
आयराने पिवळ्या रंगाच्या बिकिनीवर शर्ट परिधान केला आहे. आयराचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवड आहे आणि अल्पावधीतच या फोटोमवर हजारो लाईक्स आले आहेत.
आयरा खानने आपल्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तिला या खुर्चीवर बसण्याचं डेअर दिलं आणि सांगण्यात आलं होतं की ही खरी नाही.
आयरा म्हणाली, 'ही खरी खुर्ची नसल्याचं मला सांगण्यात आलं होतं आणि यावर बसून दाखवण्याचं डेअर देण्यात आलं होतं. मी हे डेअर पूर्ण केलं.