Chaita Navratri 2022 | चैत्र नवरात्रीत तुळजाभवानी मातेचे मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय
गर्दीच्या कारणामुळे तुळजाभवानी मातेचे मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. चैत्र पौर्णिमा पासून मंगळवार , शुक्रवार , रविवार व पौर्णिमा या दिवशी मंदिर रात्री 1 वाजता उघडणार आहे.
1 / 5
तुळजाभवानी देवीच्या उपासनेत चैत्र नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे देवळात मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात.
2 / 5
गर्दीच्या कारणामुळे तुळजाभवानी मातेचे मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. चैत्र पौर्णिमा पासून मंगळवार , शुक्रवार , रविवार व पौर्णिमा या दिवशी मंदिर रात्री 1 वाजता उघडणार आहे.
3 / 5
15 जुन पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे, तुळजाभवानी देवीची सकाळची अभिषेक पूजा पहाटे 6 वाजता होणार आहे. उन्हाळी सुट्ट्या व चैत्र महिना यामुळे तुळजापूर भाविकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 14 एप्रिल ते 18 एप्रिल या काळात देवीची चैत्र पौर्णिमा साजरी होणार आहे.
4 / 5
श्री सकंद पुराणात या देवीची अवतार कथा आढळते. कृत युगात कर्दम ऋषींचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पती बरोबर सहगमन करणेचे ठरविले. परंतु तिला अल्पवयी मुलगा असल्याने इतर ऋषीमुनींनी तिची समजूत घातल्याने अल्पवयी मुलासाठी मंदाकिनी नदीवर तटावर ती तपश्चर्या करू लागली. त्या समयी कुकर नाम दैत्याने तिचे तापाचा व पतिव्रत्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने संकट समयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दुष्ट दैत्याचा वध केला, अशी कथा प्रचिलित आहे.
5 / 5
मंदिरात कसे जालं : महाराष्ट्र राज्यातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी हे एक मुख्य पीठ आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुका येथे हे देवस्थान स्थित आहे. तुळजापूर देवस्थान सोलापूर पासून 45 किमी, उस्मानाबाद पासून 22 किमी, लातूर पासून 77 किमी व नळदुर्ग पासून 32 किमी आहे. सोलापूर व उस्मानाबाद येथे रेल्वे स्टेशन आहे.