राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे यमुना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीचं पाणी शहरातील काही भागांत शिरून साचल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली आहे.
बऱ्याच भागात नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. सिव्हिल लाइन्स, वजीराबाद, काश्मीरी गेट येथील काही भागांत पाणी साचलं आहे.
यमुना नदीच्या पातळीत बरीच वाढ झाल्याने मागच्या 45 वर्षांचा रेकॉर्ड आधीच तुटला आहे. पुरामुळे राजधानी अडचणीत सापडली आहे. अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
लाल किल्ल्याचा परिसरही पुराच्या तडाख्यात सापडला आहे.
सखल भागात पाणी साचल्याने तेथील नागरिकांना स्थलांतर करावं लागत आहे.
दिल्लीतील पूरामुळे परिस्थिती आणखीनच बिघडल्याचे दिसत आहे.
मुख्य रस्त्यांवर आलेल्या पाण्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.
शहरातील वाढत्या पाण्यामुळे यमुना बँक मेट्रो स्टेशनवर एंट्री-एग्झिट बंद करण्यात आली आहे.
दिल्लीतील ओल्ड यमुना ब्रिज येथील हे दृश्य. बस, ट्रक, डंपर हे पुराच्या पाण्यात अर्धे बुडाले असून परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसत आहे.
यमुनेचं पाणी राजधानीतील अनेक सखल भागात साचल्याने रस्त्यांना स्विमिंग पूलचे स्वरूप आलं आहे.