दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील विविध राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या समस्येनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना हवेतील प्रदूषणामुळे श्वसनविकारांसह विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसांशी संबंधित आजार उद्भवत असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया अशा काही पदार्थांविषयची माहिती....