उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारली
पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ पवार यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी गुढीपाडवा साजरा केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारली. पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ पवार यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी गुढीपाडवा साजरा केला.
प्रत्येकाच्या जीवनात नवीन वर्ष सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी मनोकामना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली
अजित पवारांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सदिच्छा भेट घेतली (File Photo)