अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर हॉलीवूडपर्यंत मजल मारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर गारूड निर्माण करणारी प्रियांका आता लवकरच नव्या सिनेमात दिसणार असून तिने या चित्रपटाची घोषणा केली आहे.
तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल तिने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
ती आता बॉलिवूडमध्ये नव्हे तर एका नव्या हॉलिवूडपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका सॅम ह्यूगन आणि सेलिन डियॉनसोबत झळकणार आहे.
प्रियांका तिच्या या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहे. खूप चांगल्या आणि ग्रेट कलाकारांसोबत काम करता येणार असून त्यासाठी मी उत्सुक आहे, असं तिनं सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तिचा आगामी सिनेमा हा 'टेक्ट्स फॉर यू' या जर्मन चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात प्रियांका एका विधवेची भूमिका साकारणार आहे.