Marathi News Photo gallery For the first time in Maharashtra, the prestigious ceremony of the magnificent Sabari Mata idol was held and a tribal dance form was performed
Dhule | बोरांइतकीच गोड शबरी मातांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा , कार्यक्रमात आदिवासी नृत्य प्रकार सादर
महाराष्ट्रातील पहिले शबरी माता चे मंदिर पुनाजी नगर तथा पुण्याचापाडा या गावी भव्यदिव्य साकारण्यात आले असून यामुळे असंख्य शबरी मातेच्या भक्तांमध्ये आनंदोत्सव निर्माण केला आहे.
1 / 6
साक्री तालुक्यातील पुनाजी नगर उर्फ पुण्याचापाडा या गावी शबरी माता ट्रस्ट नियोजित समितीच्या वतीने शबरी माता,राम सीता लक्ष्मण आधी देव-देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे.
2 / 6
डोळ्यात तेल घालून प्रभू रामांची वाट पाहणाऱ्या शबरी मातेचे हे महाराष्ट्रातील पहिलेच मंदिर आहे. कर्नाटकातील हम्पी येथे देवी शबरीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते.
3 / 6
महाराष्ट्रातील पहिले शबरी माता चे मंदिर पुनाजी नगर तथा पुण्याचापाडा या गावी भव्यदिव्य साकारण्यात आले असून यामुळे शबरी मातेच्या भक्तांमध्ये आनंदोत्सव निर्माण केला आहे.
4 / 6
या भव्य दिव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देव देवतांचा जागर करीत भाविक भक्तांनी जयघोष करीत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संतोष देशमुख व ईश्वर गायकवाड सह गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते.
5 / 6
या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त उपस्थितांसमोर गावातील आदिवासी तरुण तरुणींनी आदिवासी संस्कृती, रिती-रिवाज आणि पारंपारिक नृत्य सादर करीत भाविकांना मंत्रमुग्ध केले. टाळ्यांचा कडकडाट करत या नृत्य सादर करणार्या आदीवासी कलाकारांचे कौतुकही यावेळी करण्यात आले.
6 / 6
या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त धार्मिक विधीनुसार पूजा करून भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून अनेक राजकीय शासकीय प्रशासकीय तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती.