क्षितीज पटवर्धन लिखीत ‘धुरळा’या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कामगिरी करत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.
आज या सिनेमाला एक वर्ष पूर्ण झालंय. त्यानिमित्त चित्रपटातील कलाकारांकडून या चित्रपटातील आठवणींना उजाळा देण्यात येतोय.
अभिनेत्री सई ताम्हणकर सोबतच आता अभिनेता सिद्धार्थ जाधवनंसुद्धा काही झक्कास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सिद्धार्थनं पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. हे जॅकेट सर्वांचं लक्ष वेधून घेतंय, कारण या जॅकेटवर 'सिमेंट शेठ' असा उल्लेख करण्यात आला आहे.
'निर्माते तंत्रज्ञ आणि एका प्रचंड तगड्या अनुभवी स्टार कास्ट सोबत काम करण्याचा अनुभव त्यातून निर्माण झालेला तो ऋणानुबंध... या साऱ्याकडे आज सिमेंटशेठ च्या बड्डे ला पुन्हा एकदा 'धुरळा' उडतोय... Celebrating one year of 'धुरळा'....' असं कॅप्शन देत सिद्धर्थनं हे फोटो शेअर केले आहेत.