बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी अभिनयासोबतच तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. आता तिनं काही हॉट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
तर दिशा सलमान खानसोबत राधे या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती एक एक विलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे.
दिशानं या फोटोशूटसाठी निळ्या रंगाचा सिक्विन टॉप परिधान केला आहे. हा टॉप होल्टर नेकचा लूक देतोय. दिशाने या टॉपसोबत डेनिम शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. बेल्ट वापरण्या ऐवजी तिनं एक चेन कॅरी केली आहे ज्यामुळे ती अधिकच सेक्सी दिसत आहे.
दिशाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात धोनीच्या बायोपिकपासून केली. ‘एम एस धोनी’ या सिनेमात दिशाने प्रेक्षकांची मनं जिंकली. याच चित्रपटानंतर तिला खास ओळख मिळाली. नंतर दिशानं 'मलंग' चित्रपटातसुद्धा उत्तम काम केलं.