दिवाळी म्हटलं की एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चैतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी यंदा मालिकांमध्येसुद्धा दिसणार आहे.
लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’च्या सेटवरही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला.
सीईओ झाल्यानंतर शनायाचं ‘राधिका मसाले’मध्ये पाहिलं लक्ष्मीपूजन आणि पहिला पाडवा असणार आहे.
या निमित्ताने 300 कोटींची मालकीण अर्थात राधिका सुभेदार खास कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
यावेळी प्रेक्षकांना राधिका-आनंद आणि शनाया-सौमित्रची भाऊबीज पाहायला मिळणार आहे.
अनलॉकनंतर चित्रीकरण सुरू झाल्यापासून सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ सेटवरच राहत होते.
सगळी काळजी घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या सर्वांचा खास भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.