आहार तज्ज्ञ कायमच प्रक्रिया केलेल्या पॅकेज फुडपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. यात चिप्स, फ्रोजेन फूड्स आणि स्नॅक्स इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. हे पदार्थ जास्त तेल आणि मसाल्यांचा उपयोग करुन बनवले जातात. हे खाल्ल्यानं वजन वाढण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न तयार होऊ शकतात.
केक आणि कुकीजचं सेवनही कमी केलं पाहिजे. हे पदार्थ मैदा, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटपासून बनवलेले असतात. ते आरोग्यासाठी अपायकारक आहेत.
नुडल्स सकाळच्या वेळेत ब्रेकफास्टमध्ये खाऊ नये. नुडल्स मैद्यापासून बनवतात. त्यात फायबरचं प्रमाण अधिक असतं. नुडल्स खायला चवदार असतात, मात्र ते आरोग्यासाठी अपायकारक असतात.
बाजारात मिळणारा फ्रूट ज्युस पिणं टाळा. यात साखरेचं प्रमाण खूप अधिक असतं. याऐवजी तुम्ही ताजा रस पिण्याला प्राधान्य द्या.
एक कप कॉफी पिणं सकाळच्या वेळेत खूप सामान्य आहे. मात्र हे आरोग्यसाठी अपायकारक ठरु शकतं. उपाशी पोटी कॉफी पिल्यानं अॅसिडिटी होऊ शकते.