जीन्सचा इतिहास सुमारे 200 वर्षांचा आहे. आजही जीन्सचं तेच रूप आहे जे पहिल्यांदा लिवाइस कंपनीने बनवलं होतं. कालांतराने लिवाइस कंपनीने त्यांच्या जीन्समध्ये छोटे छोटो बदल केले, पण एक गोष्ट कायम राहिली जीन्सचा रंग. जगातील जवळपास 80 टक्के जीन्स निळ्या रंगाच्या असतात. कधी विचार केला आहे का बहुतेक जीन्सचा रंग निळा का असतो? त्याचे रहस्य जाणून घ्या...
त्या काळात जीन्सला निळा रंग देण्यासाठी नैसर्गिक इंडिगो डाईचा वापर केला जात असे. ही एक प्रकारची केमिकल डाई असते.जीन्सला निळा रंग देण्यासाठी हे अनेक दशकांपासून वापरले जात आहे. हा रंग जीन्स रंगविण्यासाठी वापरला जात असे कारण जीन्स रंगवताना नैसर्गिक इंडिगो डाईचा रंग त्याच्या एका बाजूला चढतो आणि तो जीन्सच्या आतील बाजूस चढत नाही. याशिवाय, त्याचा रंग निळा निवडण्याची अनेक कारणे आहेत.
सुरुवातीच्या काळात जीन्स निळ्या रंगात रंगवण्याचे आणखी एक कारण होते. त्या काळी इतर केमिकलच्या तुलनेत इंडिगो डाई अत्यंत स्वस्त आणि परवडणारे होते. म्हणूनच जीन्ससाठी हा रंग निवडला गेला. जीन्स घालण्याच्या संस्कृतीत हा रंग सर्वात लोकप्रिय झाला. त्यामुळे हा रंग सर्वाधिक आवडला जाणाऱ्या रंगापैकी एक आहे.
आश्चर्यकारक हे आहे की सुरुवातीच्या काळात अमेरिकेत वर्कर्ससाठी जीन्स बनवल्या जात होत्या. तेव्हा त्यासाठी कोणता रंग ठरवला गेला नव्हता. पण, जेव्हा रंग देण्यासाठी इंडिगो डाईचा वापर सुरू झाला तेव्हा जीन्स धुतल्या हळूहळू ती सॉफ्ट होत जायची. अशा प्रकारे, हा रंग वापरण्याचा अनुभव चांगला होत गेला.
जीन्स बनवणाऱ्या या लिवाइस कंपनीने जीन्सला सर्वात लहान खिसा देण्याची प्रथा सुरू केली. अधिकृतपणे या पॉकेटला 'वॉच पॉकेट' असे संबोधण्यात आल्याचे वस्त्रोद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा वापर साखळीचे घड्याळ ठेवण्यासाठी केला जात असे. जेव्हा जीन्स ट्रेंडमध्ये येऊ लागली तेव्हा कंपनीने या घड्याळासाठी खास एक पॉकेट बनवले, त्यामुळे त्याला वॉच पॉकेट असे नाव देण्यात आले.