उन्हाळा असो किंवा थंडी सर्वजण आपला चेहरा नेहमी धुतात. धूळ, माती, प्रदूषणामुळे दिवभरात चेहऱ्यावर खूप घाण जमा होते. अशा परिस्थितीत चेहरा धुणे फार महत्वाचे असते. पण चेहरा धुताना काही चुका टाळल्या पाहिजेत, अन्यथा त्वचेचे नुकसान होऊ शकते.
टॉवेल योग्य रितीने वापरा - चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने हलक्या टिपून पुसावा. चेहरा कधीच जोरात रगडून पुसू नये. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या करू नयेत.
गरम पाण्याचा वापर टाळा - चेहरा धुताना जास्त गरम पाणी वापरू नये. हे त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. चेहरा धुण्यासाठी नेहमी कोमट पाणी वापरावे.
मेकअप काढून टाका - मेकअप केला असेल तर चेहरा धुण्यापूर्वी कापसाने स्वच्छ पुसून घ्यावा. त्यानंतरच चेहरा धुवा. मेकअप पाण्याने कधीही धुवू नका.
साबणाने चेहरा धुवू नका - चेहरा कधीच साबणाने धुवू नये. जर तुमच्याकडील फेसवॉश संपला असेल तर तुम्ही बेसन वापरू शकता. साबण हा त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. तसेच दिवसभरात वारंवार चेहरा धुवू नका, त्यामळे चेहऱ्याची चमक कमी होऊ शकते आणि त्वचेचे नुकसानही होऊ शकते.