डॉ.मनमोहन सिंह, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा बदलली…
देशाला आर्थिक विकासाची कवाडे उलगडणारे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे आज ९२ व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाला आर्थिक संकटातून वाचविणारा थोर अर्थतज्ज्ञ आणि मृदू भाषी राजकारणी गमावला आहे अशाच प्रतिक्रीया सर्वस्तरातून व्यक्त होत आहे. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशभरात शोकलहर उमटली आहे. त्यांच्या कारकीर्दीने देशाला आर्थिक स्थैर्य दिले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीच्या झळा बसू दिल्या नाहीत.
Most Read Stories