कारल्याचा हा ज्यूस बनवण्यासाठी फार मेहनतही कराली लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने हा ज्यूस झटपट बनू शकतो. त्यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करावा.