Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार
पुणे : सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशी परस्थिती ओढावली आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. यंदा प्रथमच धरणातील पाण्याचा वापर हा शेती पिकांसाठी होत आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील मांजरा, जायकवाडी प्रकल्पातील पाणी हे शेती पिकासाठी सोडण्यात आले होते. असाच निर्णय पुणे जिल्ह्यातही झाला आहे. येथील वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गरजेच्या वेळी पिकांना मिळाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories