मान्सून लांबल्यामुळे कडाक्याचे ऊन पडत आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात केळीचे पीक धोक्यात आले आहे.
नव्याने लागवड केलेले केळीचे रोप उन्हामुळे करपू लागले आहेत.
केळी रोपं वाचविण्यासाठी त्यावर प्लास्टिक पिशव्या व कापड लावून या उन्हापासून त्यांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
सात जूनला पाऊस सुरु होईल, या अनुशंगाने शेतकऱ्यांनी लागवड केली होती.
यंदा मान्सून उशिरा असल्यामुळे सगळ्याचं पेरण्या रखडल्या आहेत.
रब्बी हंगामात केळी बागांचं पावसानं मोठं नुकसान केलं होतं.