शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाली तर अनेक लक्षणे दिसू शकतात. त्या लक्षणांमध्ये डिप्रेशनचाही समावेश असू शकतो. आहारात काही पदार्थांचा समावेश करून लोहाची कमतरता दूर करता येऊ शकते. कोणते पदार्थ खाता येऊ शकतात ते जाणून घेऊया.
बीट - शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी बीटाचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढू शकतो. तसेचे बीटाच्या पानांमध्येही लोह मोठ्या प्रमाणात असते.
आवळा व जांभूळ - आवळा व जांभूळाची पाने समसमान घेऊन ती वाटावीत व त्यांचा रस काढावा. ह्या रसाचे सेवन करावे, त्याने लोहाची कमतरता दूर करता येऊ शकते.
डाळिंब खावे - शरीरातील लोह वाढवायचे असेल तर डाळिंब खावे. डाळिंबामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यासाठी तुम्ही डाळिंबाचे दाणे खाऊ शकता. किंवा डाळिंबाची 2 चमचे पावडर दुधासह सेवन करू शकता. त्यामुळे लोहाची कमतरता दूर होण्यास मदत मिळेल.
पालक - पालक हा लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. पालकाचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघेल.
अंजीर ठरतो फायदेशीर - शरीरात लोह कमी असेल तर तुम्ही अंजीर खाऊ शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, कॅल्शिअम, मँगनीज आणि लोह हे भरपूर प्रमाणात असते. तुम्ही रोज कोमट पाण्यासह अंजीराचे सेवन करू शकता.