शरीरातील अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर होण्याला मेटाबॉलिजम म्हणतात. अन्न पचवण्यासाठी, रक्त परिसंवादासाठी आणि श्वासोच्छ्वास सारख्या कार्यासाठी शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते, जी त्याला अन्नातून मिळते. ही ऊर्जा मेटाबॉलिज्ममधून येते. मेटाबॉलिज्म जितके चांगले असेल तितके तुम्ही अधिक उत्साही राहता.
डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होते. ओव्यामध्ये असलेले काही गुणधर्म हे मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
सॅलॅडचे सेवन केल्यानेही मेटाबॉलिज्म चांगले होऊ शकते. तसेच प्रोटीनयुक्त असा आहार घेतल्यानेही मेटाबॉलिज्म बूस्ट होते.
दही, नट्स, चणे आणि पनीर हे पदार्थ मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत करतात.
दालचिनीच्या चहामध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म हे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात.