लूज मोशन : अंड्याचा पिवळा भाग म्हणजेच पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते. जर एका दिवसात जास्त अंडी खाल्ली तर अशा परिस्थितीत लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. जे लोक जिममध्ये जाऊन कठोर व्यायाम करतात, तेही बहुतांश प्रमाणात अंड्याचा पांढरा भाग खातात.
हार्ट ॲटॅकचा धोका : एका रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात अंडी खाल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असेल व त्याकडे दुर्लक्ष केले तर हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.
गॅसेसचा त्रास : जास्त अंडी खाण्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे त्यामुळे शरीरात गॅसेसचा त्रास होऊ शकतो. ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात काही लोकं 3 ते 4 अंड्यांचे ऑम्लेट खातात. मात्र त्यानंतर गॅसेसमुळे त्यांचं डोक दुखू लागतं किंवा शरीराच्या इतर भागात गॅसचा त्रास जाणवतो.
ब्लड शुगरची पातळी : अंडं हे सूपरफूड मानले जात असले तरी त्यामुळे शरीरातील इन्सुलिन बिघडू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? अशा परिस्थितीमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि हे वारंवार झाल्यास मधुमेह होण्याचाही धोका उद्भवतो..