Republic Day 2021 | प्रजासत्ताक म्हणजे काय? शिक्षणमंत्र्यांची ‘शाळा’
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशात ‘72 वा प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. (Varsha Gaikwad Tweet Information about Republic Day 2021)
वर्षा गायकवाड
Follow us
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशात ‘72 वा प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर भारताची विविधता आणि सामर्थ्य दर्शविणारी दृश्ये दाखवण्यात आली.
तर सोशल मीडियावर देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल रंजक माहिती सांगितली आहे.
26 जानेवारी 1950 रोजी भारताला प्रजासत्ताक म्हणून मान्यता मिळाली. पण प्रजासत्ताक दिनासंबंधी रंजक माहिती मुलांना कळावी. या उद्देशाने काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, असे ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
वर्षा गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दलची माहिती मुलांना फोटोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मुलांनो तुम्हाला माहिती आहे का? अशी हेडींग असणार आठ फोटो पोस्ट केले आहे.
यातील प्रत्येक फोटो प्रजासत्ताक दिनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.