राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
भाजपला ‘राम राम’ म्हणत त्यांनी ‘घड्याळा’ची वाट धरली आहे.
आज महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र, राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यासंबंधित तक्रारीमुळे हजर राहू शकले नाहीत.
खडसेंसोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाषणादरम्यान एकनाथ खडसे भावूक झाले.
त्याशिवाय, रोहिणी खडसेही भावूक झालेल्या दिसल्या
एकनाथ खडसे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता मंत्रिमंडळात फेरबदल करुन शिवसेनेच्या कोट्यातील कृषीमंत्रीपद खडसेंना दिलं जाणार अशी चर्चा सुरु आहे.