Ekta Kapoor : ‘डेलीसोप क्वीन’ लग्नबंधनात अडकणार? एकता कपूरच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा!
एकता कपूर एका फोटोमुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.(Ekta Kapoor's Instagram post)
मुंबई : टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचलेली निर्माती एकता कपूर एका फोटोमुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. एकतानं तनवीर बुकवालासोबत एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये दोघंही सेल्फी घेताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिनं ‘आता आम्ही इथे आहोत…तुम्हा सर्वांना लवकरच कळवू’, असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर चाहत्यांकडून अनेक कमेंट करण्यात येत आहेत. या ‘क्लोज’ फोटोमुळे एकता लग्न करणार आहे का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यात काहींनी तुम्ही लग्न करा, अशीही कमेंट केली आहे.
तर, दुसरीकडे तनवीरनं या फोटोवर ‘या मैत्रीला नात्यात बदलण्याची वेळ आली आहे’, अशी कमेंट केली आहे. तर, अभिनेत्री मृणाल ठाकुरनं या पोस्टवर ‘क्यूटीज’ अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
एकतासोबत लग्न करण्यासाठी तयार होता करण जोहर करण जोहर यांनी एका मुलाखतीत आपण एकताशी लग्न करायला तयार असल्याचं म्हटलं होतं. ‘जर मला आणि एकताला योग्य जोडीदार मिळाला नाही, तर मी एकतासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे’, असे त्याने म्हटले होते. सोबतच करण बोलला की,’आमच्या दोघांच्या लग्नामुळे माझी आई प्रचंड आनंदी होईल. कारण तिला मालिकांमध्ये पुढे काय होणार, हे आधीच माहिती असेल’. करणची ही मुलाखत प्रचंड व्हायरल झाली होती.
आई झाल्यावर एकतानं सांगितली ‘ही’ गोष्ट एकता कपूर एका मुलाची आई आहे. लग्नाआधी आई झाल्यावर तिनं ‘मी खूप दिवसांपासून विचार करत होते, मात्र, मी फार गोंधळलेली होते की, मी पुढे लग्न करावं की नाही किंवा उशिरा लग्न करावं’, असं तिनं म्हटलं होतं.