साताऱ्यातील पाटणमध्ये जंगली सुरण अर्थात एलिफन्ट वाम ही दुर्मिळ वनौषोधी आढळली आहे.
महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीची फुलं विविध आकारात फुलत आहेत.
पाटण येथे फुललेल्या या वनस्पतीला गणेशमूर्तीचा आकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही वनस्पती विशेष लक्ष वेधून घेतेय.
तर या दुर्मिळ वनस्पतीचा भारतीय औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो अशी माहिती वनस्पती संशोधकांनी दिली आहे.