टीम इंडियाचे 2 वेगवेगळे संघ एकाच वेळेस 2 देशांच्या दौऱ्यावर जाणार, याबाबतची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली. टीम इंडियाची एक टीम विराट कोहलीच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंची पलटण श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. एकाच देशाचे 2 संघ वेगवेगळ्या दौऱ्यावर जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. भारताच्या या दुहेरी दौऱ्याच्या निमित्ताने याआधी कोणकोणत्या देशाच्या 2 संघांनी विविध देशाचे दौरे केले होते हे आपण जाणून घेणार आहोत.
सचिन तेंडुलकर
गेल्या 2020 या वर्षात कोव्हिड दरम्यान इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेचा शेवट 28 जुलैला होणार होता. त्यानंतर 2 दिवसांनी इंग्लंडला आयरलंड विरुद्ध वनडे सीरिज नियोजित होती. या मालिकेला 30 जुलैपासून होणार होती. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणं शक्य नव्हतं. त्यामुळे अशा वेळेत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या वनडे सीरिजसाठी दुसऱ्या संघाची घोषणा करण्यात आली.
नुकतंच ऑस्ट्रेलियाने 2 संघांची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाला फेब्रुवारी-मार्चमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिका खेळायची होती. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका विरुद्ध टेस्ट सीरिजमध्येही दोन हात करायचे होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाने 2017 मध्ये 2 वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी 2 स्वतंत्र संघांची घोषणा केली होती. यामध्ये एका संघातील खेळाडूचा दुसऱ्या संघात समावेश होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाला श्रीलंके विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळायची होती. या मालिकेचे आयोजन 17-22 फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले होते. मात्र या मालिकेनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात होणार होती. ऑस्ट्रेलियाला टीम इंडिया विरुद्ध पुण्यात कसोटी सामना खेळायचा होता. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या संघ जाहीर करावा लागला होता.